November 18, 2025 8:13 PM

views 47

राष्ट्रीय जल पुरस्कारांमधे सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली इथं आज झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य विभागात प्रथम पुरस्कारने गौरवण्यात आलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.  राज्य सरकारनं राबवलेल्या जलव्यवस्थापन धोरणांचा आणि शेतकरी, पाणी वापर संस्था तसंच प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागाचा हा विजय आहे, अशी भावना विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.    या विभागात गुजरातला द्विती...