March 16, 2025 3:59 PM March 16, 2025 3:59 PM
45
आज ‘राष्ट्रीय लसीकरण दिन’
आज देशभर राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जात आहे. लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी दरवर्षी १६ मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो. १९९५ साली याच दिवशी प्रथमत: देशातून पोलिओ निर्मूलनासाठी तोंडाद्वारे लस द्यायला सुरुवात झाली होती. देशातल्या प्रत्येक बालकाचं रोगसंसर्गापासून संरक्षण करण्याच्या हेतूनं लसीकरण आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या कामी आरोग्य मंत्रालयासह राज्य सरकारं आणि आरोग्य विभागातले कर्मचारी वचनबद्ध असल्याचं या संदेशात नमूद केलं...