January 14, 2025 9:07 PM January 14, 2025 9:07 PM
7
राष्ट्रीय हळद बोर्डाच्या स्थापनेचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत
देशातल्या हळद उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसंच हळद उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी केंद्रसरकारने राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं या हळदबोर्डाचं उद्घाटन केलं. तेलंगणात निजामाबाद इथं या बोर्डाचं मुख्यालय असून श्री पल्ले गंगा रेड्डी त्याचे पहिले अध्यक्ष असतील असं गोयल यांनी सांगितलं. या बोर्डावर केंद्रसरकारच्या विविध खात्यांचे तसंच विविध हळद उत्पादक राज्यांचेही प्रतिनिधी नेमले जातील असं ते म्हणाल...