August 9, 2024 7:32 PM August 9, 2024 7:32 PM
7
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या विशिष्ट नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येनं पहिल्यांदाच १० कोटींचा टप्पा पार
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या विशिष्ट नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येनं पहिल्यांदाच १० कोटींचा टप्पा पार केला आहे. मार्च २०२१ मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ४ कोटीवर पोहोचली होती. हा आकडा गाठण्यासाठी २५ वर्षांचा काळ लागला होता. मात्र, त्यानंतर सुमारे ६ ते ७ महिन्यात पुढचे १ कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार जोडले गेले होते. तर, केवळ ५ महिन्यात गुंतवणूकदारांची संख्या ९ कोटीवरून १० कोटीवर पोहोचल्याचं, एन एस ई नं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. डिजिटायझेशन, आर्थिक समावेशन आणि गुंतवणूकदारांची जागरू...