February 27, 2025 9:55 AM February 27, 2025 9:55 AM
9
राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन
राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनं सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सांगितलं की, पॅरिस ऑलिंपिकनंतर, एक नवीन ऑलिंपिक चक्र सुरू झालं आहे त्यामुळं बदलती परिस्थिती लक्षात घेता निकषांचा आढावा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समिती १५ दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करेल.