August 29, 2025 1:26 PM August 29, 2025 1:26 PM
1
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जात आहे. क्रीडा दिनाच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून प्रधानमंत्र्यांनी ज्येष्ठ हॉकी खेळाडू मेज ध्यानचंद यांना श्रद्धांजली अर्पण केली. आजही युवा पिढ्यांना मेजर ध्यानचंद यांच्यापासून प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. देशातील खेळाडूंना पाठबळ देणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि भारताला उत्कृष्ट क्रीडांचे जागतिक केंद्र बनवण...