August 23, 2025 3:03 PM August 23, 2025 3:03 PM
6
लवकरच गगनयान अंतराळात झेपावणार- प्रधानमंत्री
गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगाने विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने त्यांनी देशाला संबोधित केलं. गेल्या काही काळांत अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख आणि भविष्यातल्या मोहिमांचा सूतोवाच करताना ते म्हणाले‘आर्यभट्ट ते गगनयान’ ही या वर्षीची या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना असून यात भूतकाळाचा आत्मविश्वास आणि भविष्याचा संकल्प आहे, असं ते म्हणाले....