August 28, 2024 1:49 PM August 28, 2024 1:49 PM

views 5

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या महासंचालकपदी वरिष्ठ आयपीेएस अधिकारी श्रीनिवासन यांची नियुक्ती

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या महासंचालकपदी भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी श्रीनिवासन यांची नियुक्ती झाली आहे. श्रीनिवासन हे १९९२च्या तुकडीतले बिहार कॅडरचे अधिकारी असून सध्या ते राजगीर इथल्या बिहार पोलीस अकादमीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.  मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने त्यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केलं असून त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राहील.