April 24, 2025 3:35 PM April 24, 2025 3:35 PM

views 12

यवतमाळमध्ये काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन

राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त यवतमाळ इथं आज काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन केलं. नागरिकांना आर्थिक सामाजिक न्याय देणारी लोकशाही व्यवस्था जगायला हवी. मात्र, शासनाने गेले ३ ते ५ वर्षं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. त्यामुळे निर्णयप्रक्रियेत सामान्य माणसांचा सहभाग नगण्य होत चाललेला आहे, अशी भूमिका या आंदोलनामागे असल्याचं माजी मंत्री वसंत पुरके यांनी यावेळी सांगितलं. 

April 24, 2025 2:06 PM April 24, 2025 2:06 PM

views 17

बिहारमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन

देशाचा विकास गावखेड्यांच्या विकासातून साकार होतो, या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर पंचायती राज योजना राबवण्यात येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमध्ये मधुबनी इथे पंचायती राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.   गेल्या दशकात पंचायतींना बळकट करण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. २ लाखांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या त्यामुळे अनेक आवश्यक कागदपत्रं मिळणं सुलभ झालं. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनंतर ३० हजार नवीन पंचायत भवन ...