December 20, 2025 1:25 PM December 20, 2025 1:25 PM

views 2

नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या निर्णयाला EDचं आव्हान

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयानं नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतरांवर ईडीनं आरोपपत्र दाखल केलं होतं. दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं हे आरोपपत्र फेटाळलं होतं मात्र याप्रकरणी तपास सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. आरोपपत्र फेटाळण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची ईडीची मागणी आहे.

December 16, 2025 1:51 PM December 16, 2025 1:51 PM

views 29

National Herald: ईडीच्या आरोपपत्राची दखल घ्यायला न्यायालयाचा नकार

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीच्या एका न्यायालयानं आज नकार दिला. राऊज ॲव्हेन्यू न्यायालयातले विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी हा निर्णय दिला. मात्र, कायद्याला धरून तपास सुरू ठेवायचा हक्क ईडीला आहे, असंही त्यांनी सांगितलं. आरोपपत्राची दखल घ्यायला नकार देण्याच्या या निर्णयाविरोधात अर्ज दाखल करणार असल्याचं ईडीनं म्हटलं आहे.

April 15, 2025 7:02 PM April 15, 2025 7:02 PM

views 9

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर आरोपत्र दाखल

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या आरोपपत्राची तपासणी केली आणि पुढची प्रक्रिया येत्या २५ तारखेला होईल, असं सांगितलं. आरोपपत्रातल्या इतर नावांमधे काँग्रेसनेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचा समावेश आहे.