August 14, 2024 9:46 AM August 14, 2024 9:46 AM
8
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात डिजिटल आरोग्य करार
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण अर्थात एनएचए आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजे एमयूएचएस यांच्यात काल डिजिटल आरोग्य उपक्रमांबाबत सामंजस्य करार करण्यात आला. वैद्यकीय शाखेत डिजिटल आरोग्य शिक्षणाचा समावेश करण्याच्या प्रक्रियेतला हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढेल आणि लाखो लोकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होईल असं केंद्रिय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले. या करारानुसार एमयूएचएस आपला डिजिटल आरोग्य अभ्यासक्रम एनएचए ला देणार असून आयुष्मान भा...