August 7, 2025 3:10 PM August 7, 2025 3:10 PM
3
संत कबीर हातमाग पुरस्कार सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना प्रदान
देश आज अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करत आहे. ब्रिटीशांच्या राजवटीचा विरोध करताना हातमागासह अन्य स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन म्हणून ७ ऑगस्ट १९०५ रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नवी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले. सोलापूरच्या राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग पुरस्कार मिळाला आहे. साडेतीन लाख रुपये रोख, सुवर्णमुद्रा, ताम्रपट, श...