September 11, 2024 8:32 PM September 11, 2024 8:32 PM

views 15

राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील आशा बावणे यांचा समावेश आहे.   केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं १९७३ मध्ये राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार देण्यास सुरुवात केली. हे पुरस्कार उल्लेखनीय काम करणाऱ्या परिचारिकांना दिला जातो.