July 4, 2025 9:07 AM
32
पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता असलेल्या 97 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात
पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता असलेल्या 97 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक पीयूष आनंद यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करण्याचा NDRF चा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.