July 24, 2025 9:41 AM July 24, 2025 9:41 AM

views 72

केंद्रीय गृहमंत्री राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ ची घोषणा करणार

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवन येथे राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ ची घोषणा करणार आहेत. हे धोरण हा एक प्रमुख सुधारणा उपक्रम असून पुढील दोन दशकांसाठी भारताच्या सहकारी चळवळीला ते मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा आहे. भारताचं पहिलं राष्ट्रीय सहकार धोरण २००२ मध्ये सादर करण्यात आलं होतं.   माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ४८ सदस्यीय समितीने नवीन धोरण तयार केले आहे. या धोरणाचं उद्दिष्ट सहकारी संस्थांना अधिक समावेशक, व्यावसायिकरित्या प्रस्था...