December 24, 2025 12:57 PM

views 127

आज ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’

ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जात आहे. वर्ष १९८६ मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून  हा दिवस ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो.

December 24, 2024 6:36 PM

views 21

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.    सोलापूरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. या वेळी पुरवठा विभागाच्या वतीनं सोलापूर शहरात ग्राहक जनजागृती रॅली काढण्यात आली.

December 24, 2024 2:53 PM

views 23

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते तीन नव्या ऍपचं उद्घाटन

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज तीन नव्या ऍपचं उद्घाटन केलं. यात जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप, आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाला शक्य होणार आहे. जागो ग्राहक ऍपमुळे ग्राहकांना URL ची माहिती मिळणं शक्य होणार आहे. तसंच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे....

December 22, 2024 7:57 PM

views 13

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जागो ग्राहक ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्ट लॉन्च होणार

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त, २४ डिसेंबर रोजी ग्राहक व्यवहार विभाग जागो ग्राहक ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्ट लॉन्च करणार आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाला शक्य होणार आहे. जागो ग्राहक ऍपमुळे ग्राहकांना URLची माहिती मिळणं शक्य होणार आहे. तसंच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे. जागृती ऍपमुळे ग्राहकांना URL ची तक्रार करता येणार आहे.