December 22, 2025 1:35 PM December 22, 2025 1:35 PM

views 16

राष्ट्रीय महिला आयोगाने तरुण संशोधकांसाठी शक्ती पाठ्यवृत्तीची घोषणा

राष्ट्रीय महिला आयोगाने तरुण संशोधकांसाठी शक्ती पाठ्यवृत्तीची घोषणा केली आहे. महिलांच्या प्रश्नांशी संबंधित धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने संशोधन करू इच्छिणाऱ्या २१ ते ३० वर्षे वयोगटातल्या भारतीय नागरिकांना ही पाठ्यवृत्ती दिली जाईल. ही पाठ्यवृत्ती सहा महिन्यांसाठी असून  त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत आवेदन करता येईल, असं आयोगाने म्हटलं आहे. 

June 3, 2025 3:08 PM June 3, 2025 3:08 PM

views 25

राष्ट्रीय महिला आयोगाचे राज्य सरकारला चौकशीचे निर्देश

ठाण्यातल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, बलात्कार, गर्भपात आणि वेश्याव्यवसायाची जबरदस्ती झाल्याच्या माध्यमांमधल्या बातमीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने याच्या चौकशीचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. आरोपीला पॉक्सो कायद्याखाली त्वरित अटक करावी आणि कृती अहवाल येत्या तीन दिवसात सादर करावा असे निर्देश राज्य पोलीस महासंचालकांना दिले आहेत. तसंच पीडित मुलीला मदत देऊन पुनर्वसन करावं असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.   उत्तरप्रदेशात गाझियाबादमध्ये महिलेवर झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या घटनेचीही  आयोगाने...

August 13, 2024 9:49 AM August 13, 2024 9:49 AM

views 13

राष्ट्रीय महिला आयोगाचं दोन सदस्यांचं पथक कोलकत्यात दाखल

राष्ट्रीय महिला आयोगाचं दोन सदस्यांचं पथक कोलकत्यात दाखल झालं आहे. कोलकत्यातल्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्लयातील महिला डॉक्टरवर कथित अत्याचार आणि खून प्रकरणी हे पथक चौकशी करत आहे. काल या पथकानं पोलिस आयुक्तांची भेट घेतली. आज ते रुणालयाला भेट देणार असून आपला अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाला सादर करणार आहे. दरम्यान, या प्रकरणी भारतीय वैद्यकीय संघटनेनं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून, निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.