December 26, 2024 2:09 PM December 26, 2024 2:09 PM

views 3

सुगम आणि स्वस्त वैद्यकीय सेवेमुळे नागरिक सशक्त – राज्यमंत्री प्रतापराव जाधव

पारंपरिक पद्धतींवर आधारित सुगम आणि स्वस्त वैद्यकीय सेवेमुळे नागरिक सशक्त झाल्याचं, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत समग्र स्वास्थ्य सेवा या चित्रपट मालिकेचं जाधव यांनी काल दिल्लीत अनावरण केलं, त्यावेळी ते बोलत होते. ही मालिका राष्ट्रीय आयुष मिशनची उल्लेखनीय प्रगती आणि परिवर्तनकारी परिणामांवर प्रकाश टाकते, आजारांना प्रतिबंध करून, निरोगी जीवनाला चालना देण्यात आयुष मंत्रालयाची भूमिका यातून विशद होत असल्याचं, जाधव यांनी नमूद केलं.