September 23, 2025 2:45 PM September 23, 2025 2:45 PM
29
आज, १०वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस
दहावा राष्ट्रीय आयुर्वेद दिन आज साजरा होत आहे. ‘आयुर्वेद प्रत्येकासाठी; आयुर्वेद पृथ्वीसाठी’ अशी यावर्षीची संकल्पना आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयुर्वेद दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम गोव्यात होणार असून त्याचं उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.