November 8, 2025 2:04 PM November 8, 2025 2:04 PM

views 33

छत्तीसगढमध्ये बस्तर जिल्ह्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं १२ ठिकाणी छापे

छत्तीसगढ मध्ये बस्तर जिल्ह्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल १२ ठिकाणी छापे टाकले. दोन वर्षांपूर्वी अरणपूर मध्ये झालेला स्फोट आणि नक्षलवादी हल्ल्यांच्या चौकशीच्या संदर्भात यंत्रणेनं काल ही कारवाई केली.   सी पी आय या बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंधित ठिकाणांवर केलेल्या या छापेमारीत काही आक्षेपार्ह कागदपत्रं, डिजिटल उपकरणं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.