August 21, 2024 8:11 PM August 21, 2024 8:11 PM

views 8

राष्ट्रीय अंतराळ दिवसानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन

पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस येत्या शुक्रवारी म्हणजे २३ ऑगस्टला देशात साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार असल्याची माहिती अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत दिली. ते बातमीदारांशी बोलत होते. गेल्यावर्षी आजच्या दिवशी चंद्रयान ३ मिशन अंतर्गंत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या पोहोचलं आणि हे मिशन यशस्वी झालं. चंद्रावर यशस्वीरित्या पो...