July 5, 2024 3:45 PM

views 9

आषाढीनिमित्त नाशिकमध्ये सायकल वारी

आषाढी एकादशीनिमित्त नाशिकच्या सायकलिस्ट फाऊंडेशननं आयोजित केलेल्या सायकल वारीचा आज प्रारंभ झाला. या सायकल वारीत ३०० सायकलस्वार सहभागी झाले असून त्यात ४० महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या वारीत एका पायानं सायकल चालवणारा  एक दिव्यांग वारकरी देखील सहभागी झाला आहे.

July 4, 2024 7:41 PM

views 24

सर्वेश कुशारे याची उंच उडी क्रीडा प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातल्या सर्वेश कुशारे याची उंच उडी क्रीडा प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हरयाणात पंचकुला इथं झालेल्या पात्रता स्पर्धेत सर्वेशनं २ पूर्णांक २५ शतांश मीटर इतकी उंच उडी मारत प्रथम क्रमांक पटकावला. ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठीचा निकष त्यानं पार केला. त्याबरोबरत सर्वेशनं जागतिक क्रमवारीतही ४२ वं स्थान मिळवलं आहे. उंच उडी स्पर्धेत पात्रता फेरीतून निवड झालेला सर्वेश महाराष्ट्रातला पहिला खेळाडू ठरला आहे.

June 27, 2024 8:49 AM

views 16

नाशिक शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक ९३.४८ टक्के मतदान

विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं. संध्याकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार मुंबई पदवीधर मतदारसंघात सरासरी ५६ टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघात ७५ टक्के आणि कोकण पदवीधर मतदारसंघात ६३ टक्के मतदान झालं. नाशिक शिक्षक मतदारसंघात ९३.४८ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे.