September 14, 2024 8:35 PM

views 6

नाशिकच्या बाजारात कांद्याचे दर वधारले

कांद्याच्या निर्यातीवर किमान दर मर्यादा हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारात कांद्याचे  दर क्विंटल मागे ४०० ते ५०० रुपयांनी वधारले आहेत. लासलगाव बाजारात आज चांगल्या प्रतीच्या कांद्याला सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाला. लोकसभा निवडणुकीवेळी केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवली होती. मात्र, प्रति मेट्रीक टन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्क  कायम ठेवल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आता  केंद्र सरकारनं किमान निर्यात...

September 3, 2024 8:16 PM

views 11

नाशिक : कृषी आणि विपणन विभागाच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सीबीआयच्या ताब्यात

केंद्र सरकारच्या कृषी आणि विपणन विभागाच्या नाशिक इथल्या कार्यालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना आज सीबीआयनं रंगेहाथ पकडलं. या अधिकाऱ्यानं एगमार्कचा परवाना देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयनं सापळा रचून ही कारवाई केली. विशाल तळवडकर असं या अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव असून, न्यायालयानं त्याला ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

August 31, 2024 10:23 AM

views 14

नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव इथं उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. राजकोट इथं राज्य शासन आणि नौदलाच्या वतीनं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा लवकरच उभारण्यात येईल; तसंच नांदगावच्या शिवसृष्टीसाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नांदगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं

August 29, 2024 3:24 PM

views 19

नाशिकमधल्या सर्व मतदान यंत्रांची देखभाल दुरुस्ती तपासणी चाचणी पूर्ण

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नाशिकमधल्या सर्व मतदान यंत्रांची देखभाल दुरुस्ती तपासणी चाचणी पूर्ण झाली आहे. अकरा मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे तसंच तज्ञ अभियंते उपस्थित होेते. ही यंत्रं सुस्थितीत असल्याचं तपासणीनंतर सांगितलं.

August 17, 2024 8:10 PM

views 3

नाशिकमध्ये काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी २० जण अटकेत

बांगलादेशात सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आयोजित बंद दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आज २० जणांना अटक करण्यात आली तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. आज परिस्थिती नियंत्रणात असून हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरोधात शासन कडक कारवाई करेल, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. या घटनेत पाच पोलीस अधिकारी आणि ९ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ठिकठिकाणचं सीसीटीव्ही फ...

August 7, 2024 7:45 PM

views 15

जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून १५ टीएमसी पाणी सोडलं

नाशिक जिल्ह्यात चार दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातली सहा धरणं भरली आहेत तर आणखी सहा धरणांमध्ये ८० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत पंधरा टीएमसी पाणी सोडल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं.   गेल्या २४ तासात पावसाने विश्रांती घेतली आहे. पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुद्धा सध्या पाऊस थांबला आहे. पावसामुळे धरणातला पाणीसाठा वाढला असून गंगापूर, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी आणि केळझर या धरणामध्ये अद्य...

August 5, 2024 3:32 PM

नाशिक जिल्ह्यातल्या अक्राळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कार यांच्यात झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी रस्त्यावरच्या अक्राळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कार यांच्यात काल संध्याकाळी झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. नाशिककडून राज्य परिवहन महामंडळाची बस समोरून येणारी बलेनो कार यांच्यात धडक होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात बलेनो कारमधील दोन जणांचा होरपळून जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमी तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

July 7, 2024 7:08 PM

views 6

नाशिकमध्ये सुपर फिफ्टी उपक्रमातंर्गंत ५० विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिकच्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सुपर फिफ्टी उपक्रमातंर्गंत निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांचा आज जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गंत या गुणवंत विद्यार्थ्यांच्या अकरावी आणि बारावीच्या शिक्षणाचा खर्च करतानाच त्यांना जेईई, सीईटी, जेईई ॲडव्हान्स स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात येतं. यातील २२ विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षा, सात विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

July 7, 2024 7:05 PM

views 16

नाशिकच्या पंचवटीत भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रा

नाशिकच्या पंचवटीत आज भगवान श्री जगन्नाथ  रथ यात्रा काढण्यात आली. त्यावेळी पुरुष भाविकांसह शेकडो महिला भाविकांनीही रथ ओढला.  यात्रेतून धर्माचं तसंच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जलरक्षा नदी सुरक्षा पर्यावरण बचाव, वृक्ष वाटप करत पर्यावरण बचाव अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली.

July 7, 2024 6:59 PM

views 16

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक वसंत डहाके

नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक वसंत अबाजी डहाके यांची निवड झाली आहे. प्रतिष्ठानची वार्षिक सभा आज नाशिकमध्ये  झाली, त्यात डहाके यांची निवड करण्यात आली. प्रतिष्ठानचे नवीन विश्वस्त म्हणून ज्येष्ठ समिक्षक दिलीप धोंडगे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, लेखिका संध्या नरे- पवार यांची निवड झाली आहे.