November 29, 2024 7:24 PM November 29, 2024 7:24 PM

views 9

नाशिकच्या ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळा

नाशिक रोड इथल्या कॅट अर्थात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधले विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षान्त समारंभ आज सकाळी झाला. या प्रसंगी शानदार संचलन करत वैमानिकांच्या तुकडीनं वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. चित्ता, चेतक, ध्रुव या लष्करी हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिकं यावेळी झाली. कॅटच्या या दीक्षांत समारंभादरम्यान नेपाळ, नायजेरिया तसंच भारतीय लष्करी अधिकाऱ्यांसह ४ महिला अधिकाऱ्यांनीही हेलिकॉप्टर पायलटची पदवी प्राप्त केली.

November 10, 2024 6:11 PM November 10, 2024 6:11 PM

views 17

भाजपा संविधान बदलणार असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला जनता बळी पडणार नाही – मंत्री किरेन रिजीजू

भाजपा संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप काँग्रेस करत असून, आता जनता त्याला बळी पडणार नाही, असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.    २०१४ पासून देशाचा जो विकास झाला तितका विकास यापूर्वी कधीही झाल्याचं दिसलं नाही. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा झपाट्यानं विकास करण्याचं श्रेय २०१४ नंतर आलेल्या महायुती सरकारला द्यावं लागेल, असं ते म्हणाले. यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, आणि इतर नेते उपस्थित होते. 

November 8, 2024 7:40 PM November 8, 2024 7:40 PM

views 12

किसान सन्मान निधीची रक्कम १५ हजार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आश्वासन

महायुती सत्तेवर आल्यास किसान सन्मान निधीची रक्कम १२ हजारावरुन १५ हजार करण्याचं आश्वासन मोदी यांनी नाशिक शहरात पंचवटी इथल्या प्रचारसभेत दिलं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडें यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आदरांजली वाहिली. जनहितासाठी उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन, नळाद्वारे घराघरात पिण्याचं पाणी, मोफत अन्नधान्य, पीएम आवास योजनेत घर, कापूस-धान-सोयाबीन पिकांना अधिक हमी दर, दुधाच्या दरात वाढ तसंच शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातीवरचे निर्बंध हटवण्याचा निर्णय  सरकारने  घेतल्याचा उल्लेख त्यांनी...

October 22, 2024 7:11 PM October 22, 2024 7:11 PM

views 19

नाशिकमध्ये देवळा नगरपंचायतीत भाजपच्या १५ नगरसेवकांचा राजीनामा

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात भाजपनं तिकीट नाकारल्यानं देवळा नगरपंचायतीच्या १५ नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. मागच्या  आठवड्यात डॉक्टर राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं  जाहीर केलं  होतं.  परंतु, भाजपनं पहिल्या यादीत डॉ. राहुल आहेर यांनाच तिकीट जाहीर केल्यामुळं केदा आहेर यांचे कार्यकर्ते नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे.

October 21, 2024 4:15 PM October 21, 2024 4:15 PM

views 19

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे शेतपीकांचं नुकसान

नाशिकमध्ये विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ३८ हजार हेक्टरवरची शेतातली पिकं जमीनदोस्त झाली आहेत. या पावसामुळे ७६ हजार ५८८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चांदवड, देवळा, कळवण, त्रंबक आणि बागलाणमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मका, कांदा भातपिकांचं तसंच द्राक्ष पिकांचं नुकसान झालं आहे.

October 18, 2024 8:43 AM October 18, 2024 8:43 AM

views 14

नाशिक ते दिल्ली दरम्यानची ‘कांदा एक्स्प्रेस’ रेल्वे गाडी रवाना

दिवाळीपूर्वी बाजारातली कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी नाशिक ते दिल्ली दरम्यानची कांदा एक्स्प्रेस रेल्वेगाडी काल रवाना झाली. ही विशेष गाडी 1600 मेट्रिक टन कांदा घेऊन येत्या 20 ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं पोहोचणार असून त्यानंतर हा कांदा राजधानी दिल्लीतल्या घाऊक बाजारपेठांमध्ये वितरित केला जाईल, असं ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितलं.  

October 8, 2024 7:40 PM October 8, 2024 7:40 PM

views 17

नाशिक आणि अमरावती इथं झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू, दोन जखमी

नाशिक आणि अमरावती इथं आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.  नाशिक इथं कारचं टायर फुटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर अमरावती इथं ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जमावाने ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे.    दरम्यान, नांदेड जिल्ह्यातल्या मसलगा इथं वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

October 8, 2024 9:50 AM October 8, 2024 9:50 AM

views 6

नाशिकमध्ये लवकरच आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

नाशिकमध्ये लवकरच आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशी घोषणा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल पालघर जिल्ह्यात बोलताना केली. जव्हारमध्ये आयोजित पेसा ग्रामसभा महासंमेलनात ते बोलत होते. आदिवासी विद्यापीठाअंतर्गत, आंतरराष्ट्रीय दर्जाचं वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येईल, यामध्ये जास्तीत जास्त जागा आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील असं ते म्हणाले.  

September 22, 2024 3:41 PM September 22, 2024 3:41 PM

नाशिकमधून रेल्वेद्वारे कांद्याची निर्यात पुन्हा सुरु होणार

कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिकमधून रेल्वेद्वारे कांद्याची निर्यात पुन्हा एकदा सुरु केली जाणार आहे. त्यासाठी रेल्वेच्या वाघिणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक अरविंद मलखाडे आणि भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी दिलं. नाशिक रोड आणि लासलगाव रेल्वेस्थानकातून नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून ही निर्यात सुरू होईल. कांदा व्यापारी संघटनेबरोबर काल झालेल्या बैठकीनंतर रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.

September 14, 2024 8:35 PM September 14, 2024 8:35 PM

नाशिकच्या बाजारात कांद्याचे दर वधारले

कांद्याच्या निर्यातीवर किमान दर मर्यादा हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारात कांद्याचे  दर क्विंटल मागे ४०० ते ५०० रुपयांनी वधारले आहेत. लासलगाव बाजारात आज चांगल्या प्रतीच्या कांद्याला सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाला. लोकसभा निवडणुकीवेळी केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवली होती. मात्र, प्रति मेट्रीक टन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्क  कायम ठेवल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आता  केंद्र सरकारनं किमान निर्यात...