March 8, 2025 9:04 PM March 8, 2025 9:04 PM

views 17

देशातलं पहिलं विवाह पूर्व समुपदेशन आणि संवाद केंद्र नाशिकमध्ये सुरू

कौटूंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी देशातलं पहिलं विवाह पूर्व समुपदेशन आणि संवाद केंद्र आज नाशिक मध्ये सुरू झालं. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या केंद्राचं उद्घाटन केलं. केंद्रीय महिला आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काही दिवसांपूर्वी याची घोषणा केली होती. या केंद्रात येणाऱ्या जोडप्यांना त्यांचं आरोग्य, कुटुंब नियोजन, न्यायिक अधिकार, विवाहानंतरचे आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे.

February 16, 2025 3:34 PM February 16, 2025 3:34 PM

views 12

नाशिक शहरात बनावट कॉल सेंटरचा छडा

नाशिक शहरात बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यामध्ये अमेरिकेतल्या दीडशे नागरिकांची सुमारे  १ कोटी ९२ लाख  रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती नाशिक शहर सायबर पोलिसांनी दिली.  हे कॉल सेंटर सुरु असलेल्या बंगल्यावर गुरुवारी रात्री  पोलिसांनी छापा टाकला.  इथे बारा लॅपटॉप आणि १३ मोबाईल्सच्या सहाय्याने बनावट कॉल सेंटर सुरु असल्याचं आढळून आलं. या प्रकरणी सातजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. न्यायालयानं त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

February 16, 2025 3:34 PM February 16, 2025 3:34 PM

views 12

नाशिकमध्ये प्रत्येक भागात वॉटर मीटर बसवणार

नाशिकमध्ये होणाऱ्या असमतोल पाणी वाटपाच्या पार्श्वभूमीवर येत्या ३ महिन्यात शहराच्या प्रत्येक भागात वॉटर मीटर बसवून अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला दिले आहेत. आगामी कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी स्वच्छ ठेवणं आणि प्रदूषणमुक्त करण्यात प्रत्येकाचा सहभाग असायला हवा असं आवाहन त्यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केलं.  

February 15, 2025 3:42 PM February 15, 2025 3:42 PM

नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा इतिहास

विधानसभा निवडणुकीत १५ पैकी १४ आमदार महायुतीचे निवडून देत नाशिक जिल्ह्यानं इतिहास रचला असून याची दखल घेत नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत बोलत होते.   नाशिकच्या विकासासाठी ‘नार- पार- गिरणा’ हा सुमारे सात हजार कोटी रुपयांचा नदी जोड प्रकल्प मंजूर केल्याचं शिंदे यांनी सांगितलं. विरोधकांनी आपल्यावर टीका करण्यापेक्षा आपल्यासारखं सकारात्मक काम करून दाखवावं असं आवाहन शिंदे यांनी केलं.

January 21, 2025 8:49 AM January 21, 2025 8:49 AM

views 12

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती

राज्य सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र प्रजासत्ताक दिनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होईल, असा शासन निर्णय सरकारनं जारी केला आहे. आदिती तटकरे यांची रायगडच्या आणि गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये कुठलेही वाद नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला.

January 14, 2025 8:42 AM January 14, 2025 8:42 AM

views 4

नाशिकमध्ये झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी

नाशिकमध्ये द्वारका भागात परवा रात्री झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या आता ७ झाली आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत. राज्य शासनानं मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्चही शासनातर्फे करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी पोलीसांनी यासंदर्भात वाहन चालक, मालक आणि स्टील पुरवठादार कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

January 12, 2025 7:35 PM January 12, 2025 7:35 PM

views 10

नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेराला विजेतेपद

नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीनं आज आयोजित  मॅरेथॉन  स्पर्धेत  ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनचं  विजेतेपद मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेरा यानं  पटकावलं.  कार्तिकनं  ही  मॅरेथॉन स्पर्धा  २ तास २० मिनिटांत पूर्ण केली.  नाशिकच्या   दिंडोरी तालुक्यातल्या  सिकंदर चिंधू तडाखे यानं दुसरा क्रमांक  तर वर्धा जिल्ह्यातला  विक्रम भरतसिंह बंगरिया या धावपटूनं तृतीय क्रमांक पटकावला.    मॅरेथॉननंतर आयोजित समारंभात प्रथम क्रमांक विजेता  डॉ. कार्तिक याला   एक लाख ५१ हजार रूपये,  द्वितीय क्रम...

December 22, 2024 5:59 PM December 22, 2024 5:59 PM

views 7

कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्याची कृषीमंत्र्यांची ग्वाही

कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नाशिकला आले. त्यावेळी ते बातमीदारांशा बोलत होते. वारंवार वातावरणात होणारे बदल तसंच शेतीमालाच्या भावावर होणारा परीणाम आणि वीजेसह अन्य समस्यांबाबत काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.    दरम्यान, नाशिकमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्री मंडळात स्थान मिळालं नसल्यानं ते नाराज आहेत. मात्र, ते मंत्री असताना आम...

December 19, 2024 7:25 PM December 19, 2024 7:25 PM

views 13

नाशिकमधे सलग दुसऱ्या दिवशी कांद्याचे लिलाव बंद

कांद्याचे दर घसरत असल्यानं शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावमध्ये लिलाव बंद पाडले होते. सकाळी लिलाव सुरू होताच लासलगाव बाजार समितीत कांद्याला कमीत कमी ८०० ते जास्तीत जास्त २ हजार ९०० दर मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि लिलाव बंद पाडले. कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, निर्यात शुल्क रद्द करावे अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. आज सकाळी सुमारे अर्धा तास शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर बाजार समितीच्या मध्यस्थीने लिलाव पूर्ववत सुरू झाले. मात्र, भावात फार सुधारणा झाली नाही. गेल्या गुरूवारी ला...

December 14, 2024 7:37 PM December 14, 2024 7:37 PM

views 11

नाशिक मध्ये आज ९ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद

नाशिकचा पार आज दोन अंशांनी घसरल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीने डोकं वर काढलं आहे. आज ९ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. थंडीचा रब्बी पिकांना चांगलाच फायदा होत असल्यानं शेतकरी वर्ग आनंद व्यक्त करत आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत ८ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे.