October 6, 2025 7:13 PM October 6, 2025 7:13 PM
20
नाशिकमध्ये चित्रनगरी उभारायला राज्य शासनाची मान्यता
मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिकमध्ये चित्रनगरी उभारायला राज्य शासनानं आज मान्यता दिली. या चित्रनगरीसाठी प्रस्तावित असलेला नाशिक जिल्ह्यातला इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुसंपन्न आणि सुंदर आहे. इगतपुरी ते मुंबई अंतरसुद्धा आता लक्षणीयरित्या कमी झालं आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात मौजे मुंढेगाव इथे चित्रनगरी उभारणं उचित ठरेल, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये आज झाला. त्यासाठी महसूल विभागानं संबंधित जमीन सांस्कृतिक कार्य विभ...