December 15, 2025 5:56 PM December 15, 2025 5:56 PM
13
नाशिकमध्ये हरित कुंभाचा उत्साह
पुढच्या वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरीत कुंभ साजरा केला जाणार आहे. त्यासाठी नाशिक परीसरात १५ हजाार रोपं लावून मोठी वनराई तयार केली जाणार आहे. त्याचा प्रारंभ आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यासाठी हैदराबाद इथून वाढलेली झाडं आणली आहेत. हरीत कुंभसाठी नाशिककरांनी देखील योगदान द्यावं, असं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं. तपोवनातली वृक्षतोड ही साधुग्रामसाठी करावी लागेल. त्याला वृक्ष प्रेमींनी पर्यावरणीय अंगानं विरोध केला तर त्यांना विश्वास...