September 7, 2025 3:32 PM September 7, 2025 3:32 PM
3
प्रधानमंत्र्यांची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्याशी दूरध्वनीवरून आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. युक्रेनमधे सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची भारताची भूमिका असल्याचं मोदी यांनी या चर्चेत सांगितलं. भारत आणि फ्रान्समधल्या द्विपक्षीय संबंधांचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. जगात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी भारत - फ्रान्स भागीदारी महत्त्वाची भूमिका पार पाडत राहील असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे....