January 11, 2026 1:54 PM

views 47

प्रधानमंत्री आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यात अहमदाबाद इथं द्विपक्षीय चर्चा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यात उद्या अहमदाबाद इथं द्विपक्षीय चर्चा होणार आहे. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, आणि संरक्षण क्षेत्राविषयी यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेनं केलेल्या आक्रमणासह इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असून यात जागतिक आव्हानांवर दोन्ही नेते चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. मर्झ यांचा हा दोन दिवसांचा भारत दौरा ही आशिया खंडातली त्यांची पहिलीच भेट आहे. या भेटीत ते गुजरातमधल्या साबरमती आश्रमालाही भेट...

December 26, 2025 1:29 PM

views 64

केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवन सुलभ करण्यासाठी वचनबद्ध – प्रधानमंत्री

केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून येणाऱ्या काळात सुधारणा आणखी वेगाने होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरच्या संदेशात मोदी म्हणाले की, सरत्या वर्षात आपल्या सरकारने केलेल्या सुधारणांमुळे प्रशासनातला बदल ठळकपणे दिसून आला.   या सुधारणा गुंतागुंत सोडवून त्याचा इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी केल्या गेल्या होत्या. कररचनेचं सुलभीकरण, विवादांचं जलदगतीने निराकरण, आधुनिक कामगार संहिता यांमुळे संघर्ष कमी झाला. सरकारचा भर विश्वास, अनुमान ...

November 8, 2025 9:57 AM

views 54

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणशी दौऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणशी दौऱ्यात आज चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. मोदी यांचं काल संध्याकाळी त्यांच्या संसदीय मतदारसंघात भव्य स्वागत करण्यात आलं.   नवीन वंदे भारत गाड्या बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फोरिझपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बंगळुरू या मार्गांवरून धावणार आहेत. या गाड्यांमुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल तसंच तिथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

November 7, 2025 2:28 PM

views 90

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाची आज सुरुवात झाली. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘वंदे मातरम्‌’ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्घाटन केलं. ‘वंदे मातरम्‌’ हा एक मंत्र आहे, एक ऊर्जा आहे, एक स्वप्न आणि एक संकल्प आहे, असं प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं. हे गीत म्हणजे भारतमातेप्रति भक्ती आणि आदर व्यक्त करणारा भाव आहे, जो आपल्याला इतिहासाशी जो...

November 1, 2025 7:58 PM

views 76

छत्तीसगडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्तीसगढच्या दौऱ्यावर असून ते राज्यस्थापनादिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांच्या  हस्ते छत्तीसगडमध्ये १४ हजार २६० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज झाली. नवा रायपूर अटलनगर इथं छत्तीसगड विधानसभेच्या नव्या  इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. हरित इमारत संकल्पनेवर बांधलेली ही रचना सौरऊर्जेवर चालण्यासाठी तयार केली असून त्यात पावसाचं पाणी साठवण्याच्या व्यवस्थेचा समावेश आहे. माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ...

October 18, 2025 1:29 PM

views 65

देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणण्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका खासगी वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेत बोलत होते. आपल्या सरकारनं सुरुवातीपासूनच दिशाभूल झालेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेनं काम केलं आहे. त्यामुळेच आज देशात नक्षलवादानं प्रभावीत जिल्ह्यांची संख्या केवळ ११ वर आली असून, केवळ मागच्या काही दिवसांतच ३०३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. आज संपूर्ण जग भारताकड...

August 29, 2025 11:21 AM

views 49

प्रधानमंत्री टोकियोमध्ये 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोकियो इथं दाखल झाले असून अत्यंत  उत्साही वातावरणात त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. टोकियोमध्ये होणाऱ्या 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.   जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. शिखर परिषदेदरम्यान, दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत. तसंच गेल्या 11 वर्षांत वृद्धिंगत होत असलेली धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढे नेण्याच्या दृष्टीनं दोन्ही नेत्यांमध्ये ...

August 23, 2025 3:03 PM

views 54

लवकरच गगनयान अंतराळात झेपावणार- प्रधानमंत्री

गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगाने विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने त्यांनी देशाला संबोधित केलं. गेल्या काही काळांत अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख आणि भविष्यातल्या मोहिमांचा सूतोवाच करताना ते म्हणाले‘आर्यभट्ट ते गगनयान’ ही या वर्षीची या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना असून यात भूतकाळाचा आत्मविश्वास आणि भविष्याचा संकल्प आहे, असं ते म्हणाले....

August 23, 2025 12:37 PM

views 68

५६वी जीएसटी परिषद येत्या ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार

जीएसटी परिषदेची ५६वी बैठक येत्या ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.   जीएसटीमधला १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा हटवण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात यासंबंधीचे संकेत दिले होते.

August 23, 2025 9:59 AM

views 49

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. प्रधानमंत्री मोदी 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 29 आणि 30 ऑगस्ट हे दोन दिवस जपानला भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हा आठवा जपान दौरा असेल. तर जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्या समवेत ते पहिल्यांदाच या शिखर परिषदेत सहभागी होतील.   या दौऱ्यात ते त्यांच्या समपदस्थांसमवेत संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान अशी क्षेत्रांमधल्या भारत आणि जपान यांच्यातील वि...