September 26, 2025 12:00 PM September 26, 2025 12:00 PM

views 18

भारत, अन्न आणि कृषी क्षेत्रातील जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

जागतिक अन्न सुरक्षेत भारत सातत्यानं योगदान देत असून गेल्या १० वर्षांत देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढलं आहे असं पंतप्रधानांनी काल नवी दिल्लीत आयोजित वर्ल्ड फूड इंडिया २०२५ या कार्यक्रमात सांगितलं. आज भारत अन्न आणि कृषी क्षेत्रातील जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था आहे असंही मोदी यांनी सांगितलं. लहान शेतकऱ्यांच्या संशक्तीकरणासाठी सरकारनं अनेक धोरणे आखली आहेत, गेल्या दहा वर्षांत भारतातील २५ कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे असंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. चार दिवस चालणाऱ्या या कार्...

September 17, 2025 3:18 PM September 17, 2025 3:18 PM

views 35

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम देशभरात होत आहेत     राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी असाधारण नेतृत्व आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर महान ध्येय साध्य करण्याची संस्कृती देशात रुजवली आहे, असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात  म्हटलं आहे.   केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य, राज्याराज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय आणि इतर अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांनी मोदी यांचं अभिष्टचिंतन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फड...

September 15, 2025 1:40 PM September 15, 2025 1:40 PM

views 29

तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथं तीन दिवसीय संयुक्त कमांडर्स परिषदेचं उद्घाटन केलं. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या परिषदेत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तसंच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख देखील सहभागी झाले.   यावेळी लष्करी तसंच राजकीय धोरणांवर चर्चा होणार असून ‘सुधारणांचं वर्षः भविष्यासाठी परिवर्तन’ अशी या परिषदेची संकल्पना आहे. सशस्त्र दलांमध्ये सुधारणा, आधुनिकीकरण आणि सुसज्जता हे याचं उद्दि...

September 15, 2025 10:07 AM September 15, 2025 10:07 AM

views 31

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कोलकाता इथं संरक्षण दलाच्या संयुक्त कमांडरर्स परिषदेला संबोधित करणार आहेत. भारतीय लष्कराच्या पूर्व कमांड मुख्यालय, असलेल्या विजय दुर्ग इथं कमांडर्स परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ही परिषद 17 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमात उपस्थित राहतील. या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री काल संध्याकाळी कोलकाता इथं पोहोचले.   जगातिक स्तरावर सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक प्रगती, ...

September 6, 2025 1:38 PM September 6, 2025 1:38 PM

views 78

भारत आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि अमेरिकेतल्या संबंधाबाबत ट्रम्प यांनी अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल  प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं आहे.     भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध विशेष असून त्याबाबत चिंता करण्यासारखं काही न...