December 21, 2025 2:38 PM December 21, 2025 2:38 PM
7
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आसाममधे नामरूप इथं १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचं भूमीपूजन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते नामरूप इथं १२ हजार कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचं उद्घाटन झालं. आसाम विकासाच्या मार्गावर वेगाने प्रगती करत असून दिब्रू गढ ज्या औद्योगिक प्रगतीची स्वप्न पाहत होता, तो अध्याय आता सुरू झाला आहे, असं प्रधानमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी शहीद स्मारक क्षेत्र इथे अवैध स्थलांतरितांविरुद्धच्या आसाम आंदोलनातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. ...