August 31, 2024 9:43 AM August 31, 2024 9:43 AM

views 25

दोडामार्ग तालुक्यात औषधांचे कारखाने सुरू करण्यात येणार – खासदार नारायण राणे

सिंधुदुर्गातील जंगलातल्या वनौषधींचं सर्वेक्षण करायला सांगितलं असून दोडामार्ग तालुक्यात औषधांचे कारखाने सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवाचं उद्घाटन झालं.

August 9, 2024 7:36 PM August 9, 2024 7:36 PM

views 8

कोकण रेल्वेमार्गावरच्या स्थानकांचं सुशोभिकरण आणि फलाटावर शेड उभारण्याच्या कामासाठी राज्यशासनाकडून प्रस्ताव पाठवावा – खासदार नारायण राणे

कोकण रेल्वेमार्गावरच्या स्थानकांचं सुशोभिकरण आणि फलाटावर शेड उभारण्याच्या कामासाठी राज्यशासनाकडून प्रस्ताव पाठवावा, असं खासदार नारायण राणे आज म्हणाले. ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभन कामाचं लोकार्पण आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. तर सिंधुदुर्ग किनारपट्टीचा विकास सिंगापूरच्या धर्तीवर करण्याला आपलं प्राधान्य असून त्यासाठी सिंगापूरच्या अभियंत्यांना इथं आमंत्रित केलं आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. अशा विकासक...

June 19, 2024 3:50 PM June 19, 2024 3:50 PM

views 8

नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाने विजय मिळवला – विनायक राऊत

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत विजय मिळवला आहे, असा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोटीशीद्वारे केली आहे. राणे यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवायला आणि मतदान करायला बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.