December 4, 2025 2:55 PM December 4, 2025 2:55 PM

views 24

नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा यात्रेला सुरुवात

दत्तजयंतीच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्तमंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. सारंगखेड्यातलं हे दत्तमंदिर महाराष्ट्र, गुजरातसह मध्यप्रदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे.    दत्तजयंतीचं औचित्य साधत सारंगखेडा इथं दरवर्षी मोठ्या यात्रोत्सवाचं आयोजन केलं जातं. या यात्रोत्सवात घोडे बाजारासोबतच शेती आणि गृहोपयोगी साहित्याचा मोठा बाजार भरतो. याठिकाणच्या घोडे बाजाराला चालना देण्यासाठी इथं चेतक उत्सवाचं आयोजन गेल्या काही वर्षांपासून केलं जा...

November 16, 2025 5:25 PM November 16, 2025 5:25 PM

views 283

नंदुरबार जिल्ह्यामधल्या नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा या नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल

नंदुरबार जिल्ह्यामधल्या नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा या नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदासाठी १४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नंदुरबार ४१, शहादा २९, तळोदा २१ आणि नवापूर नगरपरिषदेच्या २३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे.  

March 22, 2025 3:30 PM March 22, 2025 3:30 PM

views 12

नंदुरबार ग्रंथोत्सव – २०२५ ला आजपासून सुरुवात

नंदुरबार ग्रंथोत्सव - २०२५ ला आजपासून शहरात सुरुवात झाली. आज सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली, यामध्ये शालेय विद्यार्थिनींनी ग्रंथ, साहित्य आणि मान्यवरांचं औक्षण केलं.   या वेळी जेष्ठ साहित्यिक निबींजीराव बागुल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय महासंघाचे कोषाध्यक्ष प्रविण पाटील, आदी मान्यवरांसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठया संख्येनं उपस्थित होते, अशी माहिती आमच्या बातमीदारानं दिली.

March 21, 2025 7:18 PM March 21, 2025 7:18 PM

views 8

नंदुरबार जिल्ह्यात आमला वनक्षेत्रात लागलेल्या आगीत १० ते १२ हेक्टर जंगल नष्ट

नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात आमला वनक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मधूनच वणवे पेटल्यामुळे आग भडकत आहे. या आगीत आत्तापर्यंत दहा ते बारा हेक्टर जंगल नष्ट झाल्याचं वनविभागानं सांगितलं. वनसंपत्तीचं नुकसान झालं असलं तरी अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही.

February 5, 2025 7:36 PM February 5, 2025 7:36 PM

views 16

नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचं स्पष्ट

नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला जीबीएस, अर्थात गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अक्कलकुवा तालुक्यातली हा मुलगी 25 जानेवारीपासून उपचारासाठी दाखल असून तिच्यात जीबीएसची लक्षणं दिसून येत होती. सध्या ती व्हॅटीलेटरवर असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

December 24, 2024 3:17 PM December 24, 2024 3:17 PM

views 12

नंदुरबारमधल्या सारंगखेडा महोत्सवात १० दिवसात तीन कोटी रुपयांचे व्यवहार

नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा महोत्सवात अवघ्या दहा दिवसात तीन कोटी रुपयांचे व्यवहार झाले. १४ डिसेंबरपासून या महोत्सवाला सुरवात झाली. यात देशभरातल्या विविध प्रांतातून २ हजार २१० घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते. यात सहाशे ५७ घोड्यांची खरेदी विक्री झाली असून यातून ३ कोटी २ लाख ५४ हजार रुपयांची उलाढाल झाली. या बाजारात एक घोडा सुमारे ५ लाख ५१ हजार रुपये किंमतीला विकला गेल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढचे ६ दिवस हा महोत्सव सुरु राहील, अशी माहीती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

October 9, 2024 7:16 PM October 9, 2024 7:16 PM

views 10

राज्यातल्या १२० आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचं मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते लोकार्पण

गेल्या दोन वर्षांत आदिवासी बांधकाम विभागाने राज्यात ३ हजार ७५० कोटी रुपयांच्या आश्रमशाळा वसतीगृहांच्या इमारती बांधल्या असून याद्वारे विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असं राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितलं. नंदुरबार इथं राज्यभरातल्या १२० आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचं लोकार्पण, तसंच भूमिपूजन आणि पायाभरणीचा कार्यक्रम दूरदृश्यप्रणालीद्वारे झाला, यावेळी गावित बोलत होते.

September 9, 2024 3:40 PM September 9, 2024 3:40 PM

views 18

नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून मानवंदना

स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱ्याने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांच्यावर इंग्रज पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. जिल्हा प्रशासनासह, जेष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील शहीद स्थळावर जाऊन हुतात्म्...

September 7, 2024 7:08 PM September 7, 2024 7:08 PM

views 9

नंदुरबार जिल्ह्यात दहा जणांना अतिसार सदृश्य आजाराची लागण

नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातल्या लांबोळा गावात दहाजणांना अतिसार सदृश्य आजाराची लागण झाली असल्याचं आढळून आल़ं आहे. या आजारानं बाधित एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चारजणांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तर अन्य दोन महिलांवर शहादा इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असून आरोग्य यंत्रणा परिस्थीतीकडं  बारकाईनं लक्ष ठेवून आहे.

September 5, 2024 3:41 PM September 5, 2024 3:41 PM

views 10

नंदुरबार शहरात विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याप्रकरणी मूक मोर्चा

नंदुरबार शहरातल्या एक शाळेत पाचवीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्या प्रकरणी आज सकल मराठा समाजाच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत. या प्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी कोठडीत झाली आहे. मात्र यात शाळा मुख्याध्यापक आणि संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार आहेत. यातील दोषीचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा सोबतच दोषींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी यावेळी मोर्चकऱ्यांकडून करण्यात आली. या मोर्चामध्ये महिला आणि ...