February 24, 2025 11:42 AM

views 48

नांदेडमध्ये महसूल क्रिडा स्पर्धांचा समारोप

नांदेडमध्ये महसूल क्रिडा स्पर्धांचा काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या स्पर्धेत कोकण विभागाने विजेतेपद पटकावलं. छत्रपती संभाजीनगर विभागानं दुसरा, तर पुणे विभागानं तिसरा क्रमांक पटकावला. दरवर्षी ही स्पर्धा घेण्याची आणि त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा बावनकुळे यांनी यावेळी केली.

February 16, 2025 7:03 PM

views 22

नांदेड वाहन अपघातात ४ जणाचा मृत्यू, १६ जखमी

उत्तर प्रदेशात बाराबंकी इथं पूर्वांचल एक्सप्रेस वे वर आज पहाटे झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. नांदेडहून आयोध्येला जाणाऱ्या भाविकांची ही टेंपो ट्रॅव्हलर गाडी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त बसला धडकून हा अपघात झाला. प्रवाशांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण उपचारादरम्यान मरण पावले. अपघातात मरण पावलेले चौघेही नांदेड जिल्ह्यातले आहेत. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे.

February 2, 2025 7:45 PM

views 16

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यात ते आज बोलत होते. चक्रधऱ स्वामी आणि त्यांच्या अनुयायांनी विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचं कार्य केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं महानुभाव पंथाच्या अनेक मंदिराचा विकास केला आहे, तसंच रिद्धपूर पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंदप्रभू देवस्थान या ठिकाणीही संवर्धनाच...

January 26, 2025 6:15 PM

views 13

नांदेडमध्ये बर्ड फ्लूमुळे ‘या’ भागात अलर्ट झोन

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात किवळा इथं कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे  तिथल्या दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित केला आहे. किवळा इथं नुकतीच कोंबड्यांमधे मरतूक दिसून आल्यानं पशुसंवर्धन विभागानं मृत कोंबड्यांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पुण्याच्या पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेत, तसंच भोपाळ इथल्या कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यांच्या तपासणीत या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बर्ड फ्लूचा प्र...

January 19, 2025 6:54 PM

views 10

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला मानवी मूत्रापासून ऊर्जेच्या निर्मितीसाठीचं अमेरिकन पेटंट

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला मानवी मूत्रापासून ऊर्जेच्या निर्मितीसाठीचं अमेरिकन पेटंट प्राप्त झालं आहे. विद्यापीठातले संशोधक प्रा. डॉ. राजाराम माने आणि डॉ. झोयेक शेख यांच्या चमूनं   मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थाची निर्मिती केली असून  या कार्बन पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येत आहे. या संशोधनाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी सौदी अरेबियाच्या किंग साउद विद्यापीठानं  घेतली होती. 

January 15, 2025 10:39 AM

views 14

नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात एक लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी ही माहिती दिली. ऑनलाइन नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

January 5, 2025 7:20 PM

views 16

नांदेड स्फोट प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाची १२ जणांची निर्दोष मुक्तता

नांदेड मध्ये पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी झालेल्या स्फोट प्रकरणी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयानं १२ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या स्फोटात दोन जण ठार झाले होते. या प्रकरणाच्या पोलीस तपासात वेगवेगळ्या बाबी पुढे आल्या होत्या. त्यानंतर तो  सीबीआय कडे सोपवण्यात आल्यानंतर सी बी आयनं सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं.  या खटल्याच्या सुनावणीत ४० साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली, मात्र सीबीआय, हा स्फोट बॉम्बस्फोट असल्याचं सिद्ध करू शकली नाही. 

January 5, 2025 11:04 AM

views 10

नांदेड शहरातल्या स्फोट प्रकरणातले सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता

नांदेड शहरातल्या बहुचर्चित स्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. नांदेड शहरात पाटबंधारे नगरातल्या एका घरात सहा एप्रिल २००६ रोजी झालेल्या या स्फोट प्रकरणात काल तब्बल १८ वर्षांनंतर न्यायालयानं निकाल सुनावला. या प्रकरणातल्या १२ आरोपींपैकी दोन आरोपींचा स्फोटातच मृत्यू झाला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने या प्रकरण दोन हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं, मात्र हा बॉम्बस्फोट असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही. त्यामुळे हा फटाक्यांचा स्फोट असल्याचं ग्राह्य धरत न्यायालय...

January 2, 2025 10:14 AM

views 18

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत हिंगोली आणि नांदेडमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन

“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं काल जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक ...

December 29, 2024 4:04 PM

views 9

नांदेडमध्ये कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक

नांदेडमध्ये कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने काल अटक केली.आपली ओळख लपवून हा इसम बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासोबतच्या दोघांना हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूरजवळ अटक करण्यात आली.