November 20, 2024 8:30 AM November 20, 2024 8:30 AM
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी देखील आज मतदान होत असून या पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील आज मतदान होत असून या टप्प्यात १२ जिल्ह्यांमधल्या ३८ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या सहाशे तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत.