April 4, 2025 8:24 PM April 4, 2025 8:24 PM
4
नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ७ महिलांचा मृत्यू
नांदेड तालुक्यात आलेगाव इथं आज सकाळी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं ७ महिलांचा मृत्यू झाला. वसमत तालुक्यातल्या गुंज येथून या मजुरांना भुईमूग निंदणीसाठी घेऊन गेलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीसह ते विहिरीत कोसळले. जवळच काम करत असलेल्या शेतमजुरांनी विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुष मजुराला बाहेर काढलं. त्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासन, नांदेड महापालिका अग्निशमन दल यांनी बचाव कार्य केलं. पाच ते सहा तास हे बचाव कार्य चाललं. प्रधानमंत्री नरेंद्...