July 11, 2024 7:33 PM July 11, 2024 7:33 PM
10
समृद्धी महामार्गाला वर्षभरात भेगा पडल्या – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
भ्रष्टाचारामुळे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला वर्षभरात भेगा पडल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते विधीमंडळ परिसरात आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असून सुद्धा मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षानं काल सदनात गोंधळ केला. त्या गोंधळात पुरवणी मागण्या मान्य करुन सरकारने लोकशाहीचा खून केला आहे अशी टीकाही पटोले यांनी केली.