August 23, 2024 6:08 PM August 23, 2024 6:08 PM
14
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू – नाना पटोले
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. विधानसभा निवडणुकीसंदर्भात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे राज्यातले प्रमुख नेते नाशिकमध्ये आले असता वार्ताहर परीषदेत पटोले यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या महायुती सरकारनं कायदा-सुव्यवस्था संपुष्टात आणली आहे, अशी टीका त्यांनी केली. बदलापूर प्रकरणात उच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेऊनही सरकार त्या आंदोलनाला राजकारणाने प्रेरित म्...