November 7, 2024 6:44 PM November 7, 2024 6:44 PM

views 9

कुणबी समाजाविषयी वापरलेले शब्द चुकीचे – नाना पटोले

भाजपा शेतकरी विरोधी असून काल भाजपा नेत्याने वणीमध्ये ज्या पद्धतीनं कुणबी समाजाविषयी अपशब्द वापरले ते चुकीचं आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपाला आम्हाला दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे जे आश्वासन दिले होते त्याची आठवण करुन द्यावी लागेल असंही ते म्हणाले. भाजपा राहुल गांधी यांना घाबरलेला असून त्यांच्या मार्गात आडकाठी करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राहुल गांधींना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प...

November 4, 2024 3:34 PM November 4, 2024 3:34 PM

views 12

…तर पटोले यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करू – आशिष शेलार

रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यावरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर बेछूट आरोप केले. मात्र, त्याचे पुरावे नसतील तर आज नाना पटोले यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, अशी माहिती भाजपाचे आमदार आणि मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.

November 3, 2024 4:09 PM November 3, 2024 4:09 PM

views 9

केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत – नाना पटोले

राज्यातल्या कापूस शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश भारतीय कापूस महामंडळाला द्यावेत द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापूस पिकवतात. तरीही २२ लाख गाठी कापसाची आयात झाल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. भारतीय काप...

October 21, 2024 7:45 PM October 21, 2024 7:45 PM

views 11

महाविकास आघाडीत ३०-४० जागांवर चर्चा सुरू

महाविकास आघाडीत ३०-४० जागांवर सहमती शिल्लक असून त्यावर उद्या मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसनं आज जाहीर केलं. काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण झाली आहे. उद्याच्या चर्चेनंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. नवी दिल्लीत ते वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे, असा ...

October 16, 2024 6:30 PM October 16, 2024 6:30 PM

views 9

सरकारने केलेले सर्व दावे खोटे असल्याचा पटोले यांचा आरोप

मागच्या दोन वर्षांत महाराष्ट्राची इतर राज्यांच्या तुलनेत पिछेहाट झाली असून सरकारने वार्ताहर परिषदेत केलेले सर्व दावे खोटे असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. राज्यात होऊ घातलेले प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात गेले, राज्यात बेरोजगारी वाढली, मुंबईतल्या मोक्याच्या जागेवरल्या जमिनी उद्योगपतींना देण्यात आल्या, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, असंही पटोले म्हणाले.

September 18, 2024 7:14 PM September 18, 2024 7:14 PM

views 11

राहुल गांधींची हत्या करण्याच्या, त्यांना इजा पोहेचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – नाना पटोले

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना इजा पोहचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या मागणीसाठी काँग्रेस उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत दिली.  गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प...

September 16, 2024 2:54 PM September 16, 2024 2:54 PM

views 8

मविआ राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू होणार – नाना पटोले

महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. शिर्डी इथं आयोजित  निवृत्तीवेतन राज्य महा अधिवेशनात ते बोलत होते. जुनं निवृत्तीवेतन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, असं पटोले म्हणाले.   राज्यात अडीच लाख सरकारी पदं रिक्त असून महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ही पदं भरली जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं. या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार सत्यजित तां...

September 15, 2024 8:14 PM September 15, 2024 8:14 PM

views 10

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिर्डी इथं पेन्शन राज्य महाअधिवेशनात बोलत होते.  या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि इतर नेते  उपस्थित होते. पटोले यांनीही त्यांच्या भाषणात हे आश्वासन दिलं. जुनी पेन्शन योजना काँग्रेसच्या काळात सुरु होती, ती अटल बिहारी वाजपेयी सरकारनं बंद केली. आणि आता भाजपा काँग्रेसवर आरोप करत आहे. पण काँग्रेसचं सर...

September 11, 2024 8:02 PM September 11, 2024 8:02 PM

views 9

राहुल गांधी यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपा खोटा प्रचार करत आहे – नाना पटोले

राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपा खोटा प्रचार करत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मी आरक्षण विरोधी नाही, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळावे”, ही भूमिका असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपानं कितीही खोटं सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असं पटोले यांनी म्हटलं आहे. 

August 24, 2024 10:15 AM August 24, 2024 10:15 AM

views 14

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाकडून मनाई

महाराष्ट्रात, बदलापूर इथं लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती; मात्र यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं काल एका सुनावणी याचिकेवर मनाई केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणी न्यायालयानं महाविकास आघाडीचे घटक पक्ष, राज्य सरकार आणि गृहविभागाला नोटीस बजावली असून त्यात न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.