March 6, 2025 5:20 PM March 6, 2025 5:20 PM

views 16

लाडकी बहीण योजना राबवतानाच अपात्र लाभार्थ्यांनी खबरदारी का घेतली नाही-नाना पटोले

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दहा लाख महिला अपात्र ठरणार आहेत, मग ही योजना राबवतानाच अपात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घेऊ नये याची खबरदारी का घेतली नाही असा प्रश्न कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला. ते पुरवणी मागण्याच्या चर्चेत विधानसभेत बोलत होते. या योजनेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाने जनतेला लुटलं आहे अशी टीका त्यांनी केली. सत्तेवर आल्यावर लाडकी बहीण योजनेद्वारे प्रतिमाह २१०० रुपये देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं, हे आश्वासन आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात पाळलं गेलं पाहिजे असं पटोले ...

March 3, 2025 7:53 PM March 3, 2025 7:53 PM

views 17

राज्यात अनेक प्रश्न असून सरकार घोषणाबाजी करत असल्याची काँग्रेसची टीका

राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजीच करत आहे, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानभवनाच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली.   राज्यपालांच्या आजच्या अभिभाषणात एकही नवा मुद्दा नव्हता, असं पटोले म्हणाले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, उद्योगधंदे राज्याबाहेर चालले आहेत, शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भाग ओसाड पडत आहे, अशी टीका त्यांनी केली.

March 3, 2025 3:11 PM March 3, 2025 3:11 PM

views 22

सरकार केवळ घोषणाबाजीच करत आहे – नाना पटोले

राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजीच करत आहे, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानभवनाच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली. राज्यपालांच्या आजच्या अभिभाषणात एकही नवा मुद्दा नव्हता, असं पटोले म्हणाले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, उद्योगधंदे राज्याबाहेर चालले आहेत, शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भाग ओसाड पडत आहे, अशी टीका त्यांनी केली. 

February 5, 2025 7:09 PM February 5, 2025 7:09 PM

views 52

सोयाबीन खरेदी केंद्र वाढवण्याची आणि सर्व खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवण्याची विरोधकांची मागणी

सर्व खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवावीत, खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सोयाबीनला ६ हजार प्रति क्विंटल हमीभाव देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं, मात्र ते पाळलं नाही, आतापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, अशी टीका पटोले यांनी केली. परभणी इथल्या नाफेडच्या सोयाबीन खरेदीला २० ते २५ दिवस मुदतवाढ द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.

December 19, 2024 3:34 PM December 19, 2024 3:34 PM

views 12

बोट दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसचा विधानसभेत स्थगन प्रस्ताव

मुंबईत काल झालेल्या बोट दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसचे नाना पटोले यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली. या घटनेबद्दल सरकारने आजचं कामकाज संपेपर्यंत निवेदन द्यावं, त्यानंतर चर्चा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या माजी सरपंचांची हत्या आणि परभणीतल्या हिंसाचाराच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा आज पुन्हा सुरू झाली. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्च...

November 28, 2024 7:45 PM November 28, 2024 7:45 PM

views 4

विधानसभा निवडणूकीत साडेसात टक्के मतदान कसं वाढलं याचं उत्तर द्यावं- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

राज्यातल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत वाढलेलं साडेसात टक्के मतदान कसं वाढलं याचं निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.   आम्हाला मतदान प्रक्रियाच संशयास्पद वाटत असून लोकांचीही अशीच भावना असल्याचं ते म्हणाले. राज्यात तब्बल ७६ लाख मतं वाढली असून संध्याकाळी साडेपाच ते साडेअकरा या वेळेत कुठे कुठे मतदान सुरु होतं याचे पुरावे आयोगानं द्यावेत असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात झालेल्या मतदान प्रक्रियेबद्दल केंद्रीय अर्थमंत्री ...

November 27, 2024 7:53 PM November 27, 2024 7:53 PM

views 14

यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवणार

यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यासंदर्भात नुकतीच दिल्लीत बैठक झाली. कॉंग्रेस अध्यक्ष मल्ल्लीकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी आपण स्वतः चर्चा केली आहे. देशभरात या संदर्भात काँग्रेस जनआंदोलन करणार आहे. राज्यात दोन दिवसानंतर सह्यांची मोहीम सुरु केली जाईल. कोट्यावधी नागरिकांच्या सह्यांचं निवेदन राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश...

November 13, 2024 7:24 PM November 13, 2024 7:24 PM

views 11

भाजप राज्यात धर्माच्या आधारावर फूट पाडत असल्याचा पटोले यांचा आरोप

भाजपाचे नेते राज्यात धर्माच्या आधारावर फूट पाडत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज यवतमाळ जिल्ह्यात प्रचारसभेत बोलत होते. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं,मात्र सध्या सोयाबीन केवळ तीन ते साडेतीन हजार रुपये दराने खरेदी केलं जात आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही. ही शेतकऱ्याची फसवणूक आहे, अशी टीका पटोले यांनी केली. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर कापूल, सोयाबीन पिकाच्या हमीभावात वाढ करू, असं आश्वासन पटोले यांनी यावेळी दिलं. 

November 11, 2024 7:45 PM November 11, 2024 7:45 PM

views 13

जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा महायुतीला सत्तेतून तडीपार करण्याची पटोलेंची मागणी

भाजपाला विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानं ते हिंदू-मुस्लीम मुद्दा उपस्थित करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघडीचे उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.     भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल न बोलता ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडण...

November 8, 2024 6:58 PM November 8, 2024 6:58 PM

views 11

प्रधानमंत्री, गृहमंत्री जाती-धर्माच्या नावानं मतं मागत असल्याची पटोलेंची टीका

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना पराभव दिसत आहे, त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाती आणि धर्माच्या नावानं मतं मागत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत केली.    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत जाती धर्माच्या नावावर माथी भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा मोदी-शाह यांचा प्रयत्न जनता खपवून घेणार नाही असं पटोले म्हणाले. जाती धर्माच्या उतरंडी ही मनुवादी भाजपाची संस्कृती असून जातींमध्ये भांडणं लावण्याचं पाप त्यांनीच केल...