December 9, 2024 7:08 PM December 9, 2024 7:08 PM

views 2

नमो ड्रोन दिदी योजने अंतर्गत २०२६ वर्षाअखेरपर्यंत महिला स्वयंसहाय्यता गटांना १५ हजार ड्रोन्स मंजूर

नमो ड्रोन दिदी योजने अंतर्गत २०२६ वर्षाअखेरपर्यंत महिला स्वयंसहाय्यता गटांना १५ हजार ड्रोन्स मंजूर केल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयानं दिली आहे. राज्यसभेत अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली. स्वयंसहाय्यता गटांच्या क्लस्टर लेव्हल फेडरेशनकडून शेतात नॅनो आणि डायमोनियम फॉस्फेट फवारणी करण्यासाठी हे ड्रोन देण्यात येत आहेत. १५ हजार ड्रोनपैकी पाचशे ड्रोन २०२३-२४ साली खते निर्मिती कंपन्यांनी खरेदी केले होते, असंही नागरी उड्डाण मंत्रालयानं सांगितलं.