June 19, 2024 8:49 PM June 19, 2024 8:49 PM
14
देशाला २०४७पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आणि परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी नालंदा विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले. शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक भागिदारी यामुळं तयार होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. जागतिक ...