June 6, 2025 7:31 PM

views 33

एक कोटी रुपयांहून अधिक बक्षिस असलेल्या १२ नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण, शरण आलेल्या १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गडचिरोली पोलिस मुख्यालयात १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर सुमारे १ कोटी १२ लाख रुपयांचे बक्षीस होतं. यावेळी आत्मसमर्पण केलेल्या १३ नक्षलवाद्यांचा सामुदायिक विवाह लावून देण्यात आला. नक्षलवादाच्या विरोधात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला असून, नक्षलवादाविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.  

May 5, 2025 1:45 PM

views 21

रायगडमध्ये एका नक्षलवाद्याला अटक

राज्य दहशतवाद विरोधी पथकानं नक्षली कारवाया करणाऱ्या रायगड जिल्ह्यातल्या एका नक्षली व्यक्तीला पुण्यातून अटक केली आहे. प्रशांत कांबळे असं या नक्षल्याचं नाव असून तो गेली १३ वर्ष भूमिगत होता. कांबळे तंत्रज्ञानात कुशल असल्यानं आपल्या ज्ञानाचा वापर नक्षली कारवायांसाठी करत असे. सुमारे दहा वर्षांपूर्वी केलेल्या एका नक्षली कृत्यासाठी तो  हवा होता मात्र त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं.

December 21, 2024 1:42 PM

views 9

दोन जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण

वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. रामसू पोयामावर चकमक, खून, दरोडा आदी संबंधित १२ गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. रमेश कुंजाम २०१९ पासून नक्षली कारवायात सहभागी असून त्याच्यावरही शासनानं दोन लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. आत्मसमर्पण योजना सुरु...