November 18, 2025 1:24 PM November 18, 2025 1:24 PM
58
आंध्रप्रदेशात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत हिडमा सह सहानक्षली ठार
आंध्रप्रदेशात सुरक्षा दलांसोबत आज झालेल्या चकमकीत माओवादी कमांडर हिडमा मडावी याच्यासह सहा नक्षली मारले गेले. हिडमा याच्यावर एक कोटी रुपयांचं इनाम होतं. अनेक हिंसक कारवायांमधे हिडमाचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ठार झालेल्यांमधे हिडमा मडावीची पत्नी राजे हिचाही समावेश आहे. आंध्र प्रदेशामधल्या अल्लुरी सितारामा राजू जिल्ह्यात आज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान, सुरक्षा दल आणि नक्षलींमधे चकमक झाली. त्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू असल्याचं पोलीस महासंचालक हरिश कुमार गुप्त...