June 12, 2025 3:10 PM June 12, 2025 3:10 PM
3
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यातल्या बहुतांश भागात येत्या चौदा तारखेपर्यंत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. आगामी तीन दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई महानगर क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा पुणे, रत्नागिरी, आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.