December 17, 2024 8:44 AM December 17, 2024 8:44 AM

views 14

जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र असल्याचा सल्ला राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी काल नागपुरात विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल बोलत होते. या समारंभात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या. तर २२१ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.

December 15, 2024 6:20 PM December 15, 2024 6:20 PM

views 10

नागपुरात राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रतल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी चार वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. उद्यापासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळापूर्वीच नागपुरात दाखल झाले आहेत. राजभवनात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपाकडून ज्येष्ठ आमदार चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गरीश महाजन, आशिष शेलार यांच्यासह मराठवाड्यातील पंकजा मुंडे, अतुल सावे, मेघना बोर्डीकर आदी १९ ...

December 13, 2024 7:47 PM December 13, 2024 7:47 PM

views 12

नागपूरमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या सातव्या अंतिम फेरीचा समारोप

नागपूरच्या हिंगणा येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या सातव्या अंतिम फेरीचा समारोप आज पार पडला. या स्पर्धेतील ज्यूरी सदस्यांनी केलेल्या मूल्यांकनावर आधारित, कौशल्य विकास मंत्रालयाने दिलेल्या ४ समस्यांवर उपाय सुचवणाऱ्या संघांना विजेते घोषित केले. विजेत्या संघांत श्री साईराम अभियांत्रिकी महाविद्यालय चेन्नई, व्यंकटेश्वरा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग बंगलोर, एक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इंदूर आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंध्र प्रदेश यांच...

November 17, 2024 3:47 PM November 17, 2024 3:47 PM

views 7

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय होईल, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने राज्यात जी विकासकामं केली आहेत, त्यामुळे राज्यातला मतदार नक्कीच महायुतीच्या बाजूने उभा राहील, असा विश्वासही चौहान यांनी यावेळी व्यक्त केला.  

November 11, 2024 7:56 PM November 11, 2024 7:56 PM

views 12

काटोल ते नागपूर रस्त्याच्या कामाला मंजूरी – मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात कटोल इथं महायुतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. मेटमांजरा आणि भागातलं ८ किलोमीटरचं वनविभागानं अडवून ठेवलेल कामासाठी १५० कोटी रूपये वाढवून काटोल ते नागपूर रस्त्याचं कामाला मंजूरी दिली असल्याचं त्यांनी म्हटलं. यामुळे नागपूरवरून अमरावतीला जाण्यासाठी पर्यायी मार्ग सुरु झाल्याचं त्यांनी सांगितलं.   काटोल, नारखेड, वरुड, मोरशी या भागात कमी होत असलेल्या पाण्याच्या पातळीसाठी जलसंवर्धनाचा उपक्रम राबवून, प्रत्येक विहरीवर सोलर पंप लाव...

November 10, 2024 3:43 PM November 10, 2024 3:43 PM

views 9

नागपूरमध्ये ३७ लाख ७१ हजार रुपयाचा महागड्या विदेशी मद्याचा साठा जप्त

नागपूरच्या धरमपेठ परिसरात ३७ लाख ७१ हजार रुपये किमतीचा महागड्या विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा मद्यसाठा हरियाणामधून आणल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

November 7, 2024 6:21 PM November 7, 2024 6:21 PM

views 9

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज ते नागपूर इथे पूर्व नागपूर मतदारसंघाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले. राज्यातल्या जनतेला परिवर्तन हवं आहे, याची आम्हाला जाणीव असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं ते यावेळी म्हणाले.   महाराष्ट्रातून उद्योगांचं पलायन झालं असून देशाचे प्रधानमंत्री हे एका राज्याचे, नसून ते सर्व देशाचे असायला हवेत, असं ते यावेळी म्हणाले, आणि मतदारांना महाविकास ...

November 7, 2024 3:52 PM November 7, 2024 3:52 PM

views 8

इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन नागपूरच्यावतीनं दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन

इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन नागपूरच्या वतीनं उद्यापासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत जल आणि शाश्वत विकास या विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेसाठी जल विषयातील ६०० तज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

October 13, 2024 9:27 AM October 13, 2024 9:27 AM

views 36

सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास कायदेशीर व्यवस्थेद्वारे नियंत्रित करण्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील रेशीमबाग मैदानावरील विजयादशमी सोहोळयासाठी मुख्य अतिथि म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के. राधाकृष्णन तसंच सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. सर्व सण आणि उत्सवामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे असं भागवत यावेळी म्हणाले. बांग्लादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात त्यांनी चिंता व्यक्त केली आणि हिंदूंना एकजूट होण्याचं आवाहन केलं. आपल्या देशाची परंपरा आणि आपली संस्कृतीचा दाखला देऊन कोलकातासारख्या घटना परत घडू नयेत यासाठी आपण सर्वानी सावध राहायला हव...

October 11, 2024 1:42 PM October 11, 2024 1:42 PM

views 9

नागपूरातील दीक्षाभूमीवर पंचशिल ध्वजारोहण करण्यात आलं

नागपूरातील पवित्र दीक्षाभूमीवर आज दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य आणि समता सैनिक दल यांच्या उपस्थितीत भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वाखाली पंचशिल ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी समता सैनिक दलाचे जवान, बौद्ध अनुयायी उपस्थित होते.    उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा सायंकाळी साजरा केला जाणार असल्यानं दीक्षाभूमीवर आजपासूनच हजारों बौद्ध अनुयायी दाखल होऊ लागले आहेत. बौद्ध अनुयायांना प्रशासनातर्फे विविध आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून धम्मचक्र प्रवर्तन दिनाची जय्य...