February 22, 2025 3:19 PM February 22, 2025 3:19 PM

views 11

नागपूर पतसंस्थेचं यश लाडकी बहीण योजनेमुळे – अदिती तटकरे

नागपूर इथल्या महिलांनी सुरू केलेल्या सहकारी पतसंस्थेचं यश हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे झालेला सकारात्मक बदल आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे सांगितलं.   ही पतसंस्था तीन हजार महिलांनी एकत्र येऊन स्थापन केली असून ती भक्कमपणे उभी असल्याचं तटकरे म्हणाल्या.  महिला आणि बालविकास विभागाच्या माविम आणि इतर उपक्रमांसोबत या पतसंस्थेला जोडून त्यांना मदत केली जाईल, असं आश्वासन तटकरे यांनी दिलं.

February 20, 2025 3:48 PM February 20, 2025 3:48 PM

views 8

नागपूर शहरात भारतीय मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा

नागपूर शहरातल्या लक्षवेध मैदानावर २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान अखिल भारतीय मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.   या स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या मैदानाचं भूमिपूजन माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते आज झालं. नागपूर महानगरपालिकेनं ही स्पर्धा आयोजित केली आहे.  

February 20, 2025 9:04 PM February 20, 2025 9:04 PM

views 3

समता सैनिक दलाचं नागपूरच्या संविधान चौकात निदर्शन

अर्थसंकल्पामधे अनुसूचित जाती, जमातीला लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा द्यावा, एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करावी आदी मागण्यांसाठी समता सैनिक दलानं नागपूरच्या संविधान चौकात आज निदर्शनं केली. रमाई घरकुल योजनेची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवा, सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाकरिता ४ टक्के दरानं अर्थसहाय्य द्या आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या.

February 7, 2025 7:24 PM February 7, 2025 7:24 PM

views 7

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात, गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडनवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ औद्योगिक महोत्सवाचं’ उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या 'पोलाद क्रांती'चा फायदा या संपूर्ण प्रदेशाला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ वर्षांत गडचिरोली हे देशाचं पोलाद उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येईल, असा ...

February 7, 2025 8:55 AM February 7, 2025 8:55 AM

views 13

पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर चार गडी राखून विजय

नागपूर इथं काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने दिलेलं २४९ धावांचं लक्ष्य, भारताने ३९ व्या षटकात सहा गडी गमावत पूर्ण केलं. शुभमन गील ने ८७, श्रेयस अय्यरने ५९ धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामना परवा नऊ तारखेला ओडिशात कटक इथं होणार आहे.

January 12, 2025 3:43 PM January 12, 2025 3:43 PM

views 2

क्रीडा महोत्सवाचा सातव्या पर्वाचं उद्घाटन नागपुरात

खासदार क्रीडा महोत्सवाचा सातव्या पर्वाचं उद्घाटन आज नागपुरात यशवंत स्टेडियम इथं झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार कंगना राणावत यांनी मॅरेथॉन आणि युवा दौडला हिरवी झेंडी दाखवून खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केलं.   नागपुरात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न केले जात असून नागपुरमध्ये साडे तीनशे मैदानं खेळण्यासाठी तयार करायचे आहेत असं गडकरी यांनी सांगितलं. यावर्षी खासदार क्रीडा महोत्सवात ८० हजार खेळाडू सहभागी होत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

January 8, 2025 7:08 PM January 8, 2025 7:08 PM

views 5

नागपूरमध्ये राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं आयोजन

नागपूरमध्ये १२ ते १४ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं  आयोजन करण्यात आलं  आहे. नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. १२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग इथे  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचं  उद्घाटन होणार आहे. अभिनेते अंकुश चौधरी यांची ...

January 3, 2025 6:57 PM January 3, 2025 6:57 PM

views 8

नागपुरात तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

आदिवासी विकास विभागानं नागपूर इथं आयोजित केलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं आज  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज्यातल्या नागपूर, नाशिक, ठाणे आणि अमरावती या चार विभागांतल्या शासकीय तसंच अनुदानित आश्रमशाळांमधले १ हजार ९१७ आदिवासी खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये  सहभागी झाले आहेत.

December 21, 2024 2:58 PM December 21, 2024 2:58 PM

views 11

विधिमंडळ अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा

विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा सवाल उपस्थित करत राज्यात ४२ मंत्री आहेत पण त्यातील मुख्यमंत्री वगळता उर्वरित मंत्री अजूनही बिनखात्याचेच आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे. कालपासून सुरू असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते. विदर्भात गेल्या अकरा महिन्यात २ हजार ३३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, गेल्या तीन वर्षांत सात हजार आत्महत्या झाल्या. शेतमालाला योग्य आणि हमी भाव सरकार देत नाही, सत्ताधारी सदस्य...

December 18, 2024 7:34 PM December 18, 2024 7:34 PM

views 9

वस्तू आणि सेवा कायद्यात दुरुस्ती, मुद्रांक शुल्कात वाढ प्रस्तावित करणारं विधेयक मंजूर

वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात २०१७ ते २०२० या ३ आर्थिक वर्षातला व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्यासाठीची अभय योजना राज्य सरकारनं लागू केली आहे. ३१ मार्च २०२५ ही कराच्या रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी देय रकमेचा भरणा केल्यास त्यावरचं सर्व व्याज आणि दंड माफ होणार असल्याने संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केलं. राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतल्या करदात्यांकडून साधारण एक लाख चौदा हजार अर्ज अपेक्षित आहेत. विव...