March 23, 2025 7:06 PM March 23, 2025 7:06 PM

views 8

नागपूरमधे हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी पूर्णपणे उठवली, मात्र पोलीस बंदोबस्त कायम

नागपूरमधे गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी आता पूर्णपणे उठवली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आज दुपारी ३ वाजल्यापासून संचारबंदी पूर्णपणे उठवण्याचे आदेश जारी केले.   गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक प्रकारानंतर कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यापैकी काही भागातली संचारबंदी २० मार्चला, तर आणखी काही भागातली संदारबंदी काल उठवली...

March 20, 2025 2:27 PM March 20, 2025 2:27 PM

views 9

नागपूर हिंसाचारप्रकरणी ६९ जणांवर गुन्हे दाखल

नागपुरमधे सोमवारी झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी १८ विशेष पथकं तयार केली असून  आतापर्यंत  ६९ जणांवर गुन्हे दाखल केल्याचं नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं आहे. ते काल  वार्ताहरांशी बोलत होते.    दंगलींच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रफिती तपासल्यावर पोलिसांनी २०० संशयितांची यादी तयार केली असून त्यांची नावं सोमवारी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात नोंदवली आहेत. चित्रफितीत आढळलेल्या इतर एक हजार संशयितांची ओळख पटवण्याचं  काम सायबर सेलच...