November 1, 2025 7:25 PM November 1, 2025 7:25 PM
20
नागपूर स्कील सेंटरमुळे युवकांच्या रोजगाराचं स्वप्न साकार होईल – मंत्री नितीन गडकरी
नागपूर स्कील सेंटरमुळे विदर्भातल्या लाखो युवकांच्या रोजगाराचं स्वप्न साकार होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. नागपूर स्कील सेंटर या कौशल्य विकास उपक्रमाचं लोकार्पण आज गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. स्मार्ट शहरांसोबत स्मार्ट गावं देखील निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. पुढील पाच वर्षात विदर्भातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ५ हजार युवकांना रोजगार देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवावं, त्याकरता कौशल्य केंद्रांची संख्या वाढ...