December 11, 2025 3:51 PM

views 16

शेतमाल आणि कापसाला वाजवी हमीभाव या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ

शेतमाल आणि कापसाला वाजवी हमीभाव या मुद्द्यावर महाराष्ट्र विधानसभेत विरोधकांनी आज प्रचंड गदारोळ केला. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे, विरोधकांनी हौद्यात उतरून निषेधाच्या घोषणा दिल्या.   या मुद्द्यावर अध्यक्षांनी आपल्या दालनात दुपारी बैठक बोलावली, मात्र सरकारने सभागृहातच उत्तर द्यावं असा आग्रह विरोधकांनी धरला. निषेधाच्या घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला.